गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
दिनांक २ जानेवारी २०२५ रोजी विनोबा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तेलकामठी येथे विद्यार्थ्यांकरिता ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन’ विषयक कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मा.श्री.अनिलजी मस्के, विनोबा एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा.श्री.ज्ञानेश्वर जी निघोट,व्हॉईस ऑफ मीडिया नागपूर जिल्हा अध्यक्ष तथा मुख्य संपादक इंडिया लाईव्ह तेज न्यूज मा.श्री.दिलीप जी घोरमारे व माजी विद्यार्थी तथा इंडिया लाईव्ह तेज चे कळमेश्वर तालुका प्रतिनिधी श्री.गिरीशजी आंदे,तेलकामठी गावाच्या पोलीस पाटील सौ. बेबीताई घोळसे मॅडम व मुख्याध्यापिका सौ बोचरे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.या प्रसंगी विनोबा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील ५ वी ते १२ वी पर्यंत विद्यार्थ्यांना सावनेर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी मा.श्री.अनिलजी मस्के यांनी मार्गदर्शन केले.यावेळी त्यांनी यूपीएससी परीक्षा कशी असते ? अभ्यास कसा करायचा ? तसेच मोबाईलचा योग्य वापर व नवीन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे संचालन श्री वांढरे सर तर आभार प्रदर्शन श्री.हळदे सर यांनी केले.या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरीता महाविद्यालयात श्री पाटील सर,श्री कुकडे सर,श्री सागर जी निघोट सर,श्री राजुरकर सर,श्री गजभिये सर,श्री पावनकर सर,काळे मॅडम तसेच भालेराव मॅडम,चंद्रकांतजी देशमुख,विनायकजी युवनाते,अभयजी बनकर या शिक्षकांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.
Home शैक्षणिक विनोबा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तेलकामठी येथे स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करताना सावनेर...