गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये महसुली उत्पन्नाच्या मर्यादा राखून अर्थसंकल्प सादर केला असून यामुळे अर्थव्यवस्था बलशाही होईल .महाराष्ट्राला आर्थिक महासत्ता बनविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून परदेशी गुंतवणूक मधे झालेली वाढ,औद्योगिक विकासामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती,निर्यात वाढवण्याचे धोरण, मुंबई ग्रोथ हब म्हणून निर्माण करणे. लाडकी बहीण योजनेसाठी 36 हजार कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले असून त्यामुळे ही योजना पुढे सुद्धा सुरू राहील. छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक बनविण्याचा संकल्प,त्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली असून पर्यटनाला चालना देण्यासाठी,शक्तिपीठ मार्गासाठी सुद्धा निधी उपलब्ध करून दिलेला आहे.कृषी व ग्रामीण विकाससाठी सुद्धा या अर्थ संकल्पामधे भरीव तरतूद करण्यात आलेले आहे. हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या शाश्वत व सर्वांगीण विकासाचा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया भाजपा ज्येष्ठ नेते,महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारिणी सदस्य- डॉ राजीव पोतदार यांनी दिली आहे.