नागपुर
दिनांक ०५-०४-२०२५ रोज़ सोमवार ला स्वस्त धान्य दुकानदार संघाची जिल्हास्तरीय मिटींग आमदार निवास नागपुर येथे पार पड़ली. या मिटींग मध्ये पदाधिकारी व सदस्यांना मार्गदर्शन करतेवेळी संघटनेचे अध्यक्ष बाबाराव आष्टणकर, महासचिव प्रकाश निंबाळकर,वर्धे चे जिलाध्यक्ष संजय देशमुख,सचिव विलास वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.
यानंतर लगेच गेल्या पाच महिण्यापासून कमिशन न मिळाल्याने स्वस्त धान्य दुकानदार संघाचे शिष्टमंडळाने आज दुपारी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना भेट दिली. तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी श्री.पडोळे साहेब यांच्याशी याविषयी चर्चा करण्यात आली.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष बाबाराव आष्टणकर, महासचिव प्रकाश निंबाळकर, सचिव विलास वाघ, नरेंद्रजी साळूंके,विनय सोनडवले, बोंदरेजी,राकेश बारापात्रे, सुनिता मानकर तसेच संघटनेचे पदाधिकारी व सदस्य गण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या चर्चेत संघटनेच्या वतीने केंद्र आणि राज्य सरकार चा निषेध” म्हणून संपूर्ण नागपुर जिल्ह्यातील धान्य दुकानदार या महिण्यात”काळ्या फिती लावून धान्य वितरित करतील व ५ मे २०२५ ला नागपुर येथील संविधान चौकात कटोरे हातात घेऊन “भिकमांगो आंदोलन” करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.